हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केले. पोलिसांच्या कामगिरीचे देशभारातून कौतुक केले जात आहे. दरम्यान बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील हैदराबाद पोलिसांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेश पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी.
Mayawati: Crimes against women are on the rise in Uttar Pradesh, but the state government is sleeping.Police here and also in Delhi should take inspiration from Hyderabad Police,but unfortunately here criminals are treated like state guests, there is jungle raj in UP right now pic.twitter.com/KeN53KCV4A
— ANI UP (@ANINewsUP) December 6, 2019
अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस
दरम्यान, 'उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत आहेत. मात्र उत्तर प्रदेश सरकार झोपले आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी. पण दुर्दैवाने येथे गुन्हेगारांना पाहुण्यांसारखे वागवले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या जंगलराज सुरु आहे.', असे मत मायावती यांनी व्यक्त केले आहे.
फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली
हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील चारही आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. शुक्रवारी सकाळी सर्व आरोपींना ज्या ठिकाणी त्यांनी पाशवी कृत्य केले होते तिथे नेण्यात आले होते. त्या ठिकाणावरुन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले.