पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मायावतींनी 'समाजवादी'वर फोडले पराभवाचे खापर, आघाडीला दिला 'ब्रेक'

अखिलेश यादव आणि मायावती

समाजवादी पक्षाबरोबर (सपा) आघाडी तुटल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या घडीला आघाडीला ब्रेक लावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मायावती यांनी एकीकडे अखिलेश आणि डिंपल यादव यांच्याबरोबरचे नाते कायम राहणार असल्याचे सांगितले असले तरी दुसरीकडे त्यांनी राजकारणात एकट्यानेच पुढे जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर सपावर फोडत यादव समाजाची मते बसपाला मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. 

मायावती म्हणाल्या की, कन्नोजमध्ये डिंपल, बदायूत धर्मेंद यादव आणि फिरोजाबादमध्ये अक्षय यादव यांच्या पराभवामुळे आम्हाला विचार करण्यास भाग पाडले. त्यांच्या पराभवाचे आम्हालाही दुखः आहे. यावरुन स्पष्ट होते की, यादव बाहुल्य मतदारसंघातही यादव समाजाची मते सपाला मिळाली नाहीत. याचाच अर्थ असा की, सपाची व्होट बँक त्यांच्यापासून दूर गेली आहे. मग ती मते बसपाला मिळालीत कशावरुन, असा सवाल करत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले. 

आघाडीवर भरवसा ठेवू नका, मायावतींचे पुन्हा एकला चलो रे...

अखिलेश आणि डिंपल यांनी मला मोठा मान-सन्मान दिला आहे. आमचे संबंध कायम असतील. पण काही राजकीय अडचणी आहेत. लोकसभा निवडणुकीतले निकाल समोर आले आहेत. दुर्देवाने सांगावे लागेल की यादव समाजाचे प्राबल्य असलेल्या जागेवरही सपाला मते मिळू शकलेली नाहीत. ही मते न मिळाल्यामुळे सपाच्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभूत व्हावे लागले आहे. ही बाब आम्हाल विचार करायला भाग पाडते, असे मायावती यांनी म्हटले. 

त्या म्हणाल्या की, आम्ही पराभवाचे चिंतन केले. बसपा हा 'केडर बेस' पक्ष आहे. आम्ही मोठे लक्ष्य ठेऊन सपाबरोबर काम केले आहे. पण आम्हाला यश आले नाही. सपाने चांगली संधी गमावली आहे. अशा परिस्थितीत सपात सुधारणा करण्याची गरज आहे. सपालाही भाजपच्या जातीयवादी आणि धार्मिक मोहिमेविरोधात लढण्याची गरज आहे. जर आम्हाला वाटले की सपा प्रमुख राजकीय कार्यांसह आपल्या लोकांना एकत्र करण्यात यश आले तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. जर ते यात अयशस्वी ठरले दर आम्ही एकट्याने पुढे जाणेच योग्य ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mayawati says her party will fight UP bypolls alone insists not a permanent break with SP