'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी न होण्याचे विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ठरविले आहे. या बैठकीला बसपच्या प्रमुख मायावती, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, डीएमकेचे प्रमुख एम. के स्टॅलिन, तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव हे उपस्थित राहणार नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे.
मायावती यांनी या संदर्भात ट्विट करून म्हटले आहे की, जर ही बैठक ईव्हीएमसंदर्भात असती, तर मी नक्कीच बैठकीला गेले असते. देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा मुद्दा हा भाजपचा कट असून, गरिबीसारख्या महत्त्वाच्या विषयापासून लोकांना दूर नेले जात आहे. लोकशाही व्यवस्था असलेल्या कोणत्याही देशात निवडणूक हा कधीच प्रश्न असू शकत नाही. त्याचबरोबर खर्च किती होतो, यावरून निवडणुकांचे मूल्यमापन केले जाऊ शकत नाही. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठीच नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या मुलाला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक
या बैठकीला देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते जाणार की नाही, हे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
ममता बॅनर्जी यांनी सर्वात आधी या बैठकीमध्ये सहभागी न होण्याचे जाहीर केले होते. ससंदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना एक पत्र पाठवून ममता बॅनर्जी यांनी या विषयावर सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली आहे. या विषयावर घटनातज्ज्ञ, निवडणूक तज्ज्ञ आणि सर्वच राजकीय पक्षांशी सखोल चर्चा केली गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शैक्षणिक पात्रतेची अट रद्द
नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक निवडणूक कल्पनेला बिजू जनता दलाने पाठिंबा दिला आहे. पक्षाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी या कल्पनेला निती आयोगाच्या बैठकीवेळीच पाठिंबा दिला होता. तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे नेते डी. जयकुमार यांनी या विषयावर सविस्तरपणे चर्चा केली जायला हवी, असे मत मांडले आहे.