पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मायावतींनी लग्न केलं असतं तरच त्यांना समजलं असतं: रामदास आठवले

रामदास आठवले (ANI)

बसपा सुप्रिमो मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पत्नीवर केलेल्या वक्तव्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला आहे. मायावतींनी स्वतः लग्न केले असते तर पतीला कसे हाताळायचे असते हे समजले असते. पण त्यांनी लग्न केलेले नाही, असा टोला आठवले यांनी लगावला. 

भाजप नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या पत्नीही घाबरतात- मायावती

मायावतींनी पंतप्रधान मोदींवर व्यक्तिगत टीप्पणी केली होती. 'बहीण आणि पत्नीचा आदर करणे मोदींना कसे कळणार. राजकीय लाभासाठी त्यांनी आपल्या पत्नीलाही सोडून दिले आहे,' अशी टीका मायावतींनी केली होती. यावरच न थांबता त्या पुढे म्हणाल्या होत्या की, 'भाजप नेत्यांच्या पत्नीही आपले पती मोदींच्या जवळ गेले की घाबरतात,' अशा शब्दांत टोला लगावला होता. मायावतींची ही टीका भाजपला चांगलीच जिव्हारी होती.

मायावतींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आठवले यांनीही त्यांच्यावर व्यक्तिगत टीप्पणी केली. ते म्हणाले, मायावतींनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पत्नीबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी (मायावती) स्वतः लग्न केलेले नाही. कुटुंब काय असते त्यांना माहीत नाही, जर त्यांनी लग्न केले असते तर त्यांना पतीला कसे हाताळायचे समजले असते. आम्ही मायावतींचा आदर करतो. त्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करु नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला. 

'गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ म्हणजे देशावरील काळा डाग'

दरम्यान मायावती म्हणाल्या होत्या की, नरेंद्र मोदी हे आधी अलवर येथील दलित महिलेवरील अत्याचार प्रकरणी गप्प बसले होते. मी यावर भाष्य केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला फायदा मिळावा यासाठी खालच्या दर्जाचे राजकारण सुरु केले. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. जेव्हा त्यांनी आपल्या निरपराध पत्नीलाच सोडले आहे. तेव्हा ते दुसऱ्यांच्या बहिणी, मुली आणि पत्नीचा आदर कसे करतील, असा खोचक सवाल केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mayawati is not married she doesnt know what a family is had says ramdas athawale on pm modi wife remark