पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मायावतींनी भाऊ-भाच्याकडे दिली मोठी जबाबदारी

मायावती

बसपा सुप्रीमो मायावती यांनी लखनऊमध्ये रविवार देशभरातील पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांचे भाऊ आनंद कुमार आणि भाचा आकाश आनंद सहभागी झाले होते. मायावतींनी या दोघांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. आनंद कुमार यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची तर आकाश आनंद यांच्याकडे राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवली आहे. 

'तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यात लावले होते ४४ एसी'

बैठकीमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि २०२२ मध्ये यूपीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ताकदीनिशी मैदानात उतरण्याची रणनिती आखण्यात आली. तसेच देशभरात पक्षाचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला. बसपाने लोकसभा निवडणुकीत मागील वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० जागा मिळाल्या. मात्र, यूपी वगळता देशभरातील अन्य राज्यात यश मिळवण्यात त्यांच्या पदरी अपयश आले. याच पार्श्वभूमीवर अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाला मजबूती देण्यासंदर्भात काम करण्यासंदर्भात मायावतींनी नेत्यांना आदेश दिले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mayawati holds a important meeting gives big responsibility to brother anand kumar and nephew akash anand