पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रसिध्द गणिततज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे निधन

वशिष्ठ नारायण सिंह

प्रसिध्द गणिततज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटणातील कुल्हरिया येथे ते कुटुंबियांसोबत राहत होते. गेल्या अनेक वर्षापासून ते आजारी आहेत. आज सकाळी अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांच्या कुटुंबियांना त्यांना पाटणा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन बच्चू कडू आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात

वशिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाची वृत्त कळताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसंच, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. वशिष्ठ सिंह यांनी संपूर्ण जगात बिहार आणि देशाचे नाव उंच केले आहे. प्रकाश झा यांनी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती.  

... यापुढे जपून बोला, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले

वशिष्ठ नारायण सिंह यांचा जन्म २ एप्रिल १९४२ रोजी बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर गावात झाला होता. लहानपणापासूनच ते खूप हुशार होते. गणिताचे जादुगार नावाने ते ओखळले जायचे. गणिताचे शिक्षक त्यांना गणित विषयाचा देव मानत असे. गणित सोपो करण्यासाठी त्यांनी अनेक सिध्दांत मांडले. १९६५ साली ते अमेरिकेला गेले होते. तिथेच त्यांनी १९६९ साली पीएचडी पदवी मिळवली होती. 

कर्नाटकमध्ये १५ बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश