पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मसूद अजहरच्या मुसक्या आवळल्या, आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरणार

मसूद अजहर

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अजहर लवकरच आंतरराष्ट्रयी दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येईल. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यातील प्रमुख अडचण ठरलेल्या चीनने या प्रकरणी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला चीनने आतापर्यंत मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे चीनवर टीका करण्यात येत होती. मसूद अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्यानंतर जैशवर आर्थिक निर्बंध अधिक कडक होणार आहेत.

चीनने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामागील आपली भूमिका बदलणे हा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मोठा विजय मानला जात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर मसूद विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने राजनैतिक पातळीवर मोठी मोर्चेबांधणी केली होती. त्यालाच यश आल्याने चीनने आपली भूमिका मवाळ केली असून, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यातील आपला अडसर दूर केला आहे.

पुलवामा हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार मसूदच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत, असे अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडने म्हटले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इस्लामिक स्टेट आणि अल कायदा विषय समितीकडून मसूदवर एक मे रोजी हे निर्बंध घालण्यात येतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडच्या या संबंधित प्रस्तावावर चीनने तांत्रिक कारण पुढे करत नकाराधिकार वापरला होता. पण आता चीनने माघार घेण्याचे ठरविले आहे.