पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन-पाकला दणका, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

मसूद अजहर

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्टीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बुधवारी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. 

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीन मोठा अडथळा निर्माण करत होता. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला चीनने आतापर्यंत मंजुरी दिली नव्हती. चीनने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामागील आपली भूमिका बदलणे हा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मोठा विजय मानला जात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर मसूद विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने राजनैतिक पातळीवर मोठी मोर्चेबांधणी केली होती. 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. यापैकी संबंधित तीन प्रस्तावावर चीनने तांत्रिक कारण पुढे करत नकाराधिकार वापरला होता. त्यानंतर चीनने माघार घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मसूद अझहरच्या नावाचा आंतरराष्ट्रीय दहशतवादांच्या काळ्या यादीत समावेश केला आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्यामुळे आता मसूद अजहरला पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशात जाता येणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा किंवा हत्यारं पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले जाणार आहे. या निर्णयानंतर  मसूदच्या अटकेसाठी पाकिस्तानवरील दबाव वाढेल त्यामुळेत्याच्यावर कारवाई करण्याव्यतिरिक्त पाकिस्तानकडे कोणताही पर्याय उरणार नाही.