पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लिव-इनपेक्षा विवाहित महिला अधिक आनंदीः RSS

मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत हे संघाशी निगडीत एका संघटनेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करणार आहेत. यात लिव-इन रिलेशनशिपच्या तुलनेत विवाहित महिला जास्त आनंदी असतात असे म्हटले आहे. हे सर्वेक्षण पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने (डीएसएपीके) केले आहे. संघाच्या या महिन्याच्या सुरुवातीला पुष्कर येथे झालेल्या समन्वय बैठकीत यावर चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते. 

लाजिरवाणे ! हुंड्यासाठी निवृत्त न्यायाधीशाकडून सुनेला मारहाण

संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणात म्हटले आहे की, विवाहित महिलांच्या आनंदाचा स्तर खूप अधिक असतो. तर लिव-इन रिलेशनशिपमध्ये महिला कमी आनंदी असतात. भागवत हे विदेशातील माध्यमांची भेट घेतील. त्यानंतर सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल.

संघाचे प्रचार प्रभारी अरुण कुमार यांनी शनिवारी अधिकृत निवेदन जारी करुन भागवत हे नियमित प्रक्रिये अंतर्गत विदेशी माध्यमांना सामोरे जातील. विविध क्षेत्रातील लोकांना भेटण्याच्या संघाच्या एका नियमित प्रक्रियेचा हा हिस्सा आहे. भागवत यावेळी संघ, त्यांच्या कार्यप्रणालीबाबत विदेशी माध्यमांशी चर्चा करतील.

नरेंद्र मोदी यांच्या या फोटोसाठी लोक दहा लाख द्यायला तयार!