पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दलित तरुणाशी लग्नामुळे चर्चेत आलेल्या साक्षी मिश्रा प्रकरणाला नवे वळण

साक्षी मिश्रा

दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे आमदार असलेले वडील मला मारण्याची शक्यता आहे, असे सांगत पोलिसांकडे संरक्षण मागणारी साक्षी मिश्रा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. साक्षी मिश्रा आणि अजितेश कुमार यांचे लग्न आपण लावलेच नाही, असे प्रयागराजमधील मंदिरातील मुख्य पूजाऱ्याने म्हटले आहे. पुरुषोत्तम दास असे त्यांचे नाव आहे. 

पुरुषोत्तम दास यांनी म्हटले आहे की, आमच्या मंदिरात साक्षी मिश्रा आणि अजितेश कुमार यांचा विवाह झालेला नाही. आमच्या येथील मंदिरात विवाह झाला म्हणून त्यांना दिले गेलेले विवाहाचे प्रमाणपत्रच बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दलित तरुणाशी लग्नामुळे वडील मारण्याच्या तयारीत, भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

साक्षी मिश्रा या उत्तर प्रदेशमधील बरैली जिल्ह्यातील बिठारी चैनपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी आहेत. अजितेश कुमार यांच्याशी लग्न केल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते.

व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या एका आवाहनात साक्षी मिश्रा यांनी म्हटले होते की अजितेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांपासून लांब राहावे. त्यांना कोणताही त्रास देऊ नये. मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. पण माझ्या वडिलांना ते पसंद नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला मारण्यासाठी गुंड पाठवले आहेत. गुंडापासून वाचण्यासाठी आम्ही सतत इकडे तिकडे धावपळ करीत आहोत. पण आम्हाला आता याचा कंटाळा आला आहे. आम्हाला आता पोलिस संरक्षण दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.