पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेअर ग्रिल्सशी हिंदीत संवाद कसा साधला?, मोदींनीच दिलं उत्तर

बेअर ग्रिल्सशी हिंदीत संवाद कसा साधला?, मोदींनीच दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. १२ ऑगस्ट रोजी डिस्कव्हरी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमात दिसले होते. या संपूर्ण कार्यक्रमात बेअर ग्रिल्स त्यांना इंग्रजीत प्रश्न विचारत होते. तर पंतप्रधान मोदी हे त्यांना हिंदीत उत्तर देत होते. या कार्यक्रमानंतर अनेक लोकांना बेअर ग्रिल्सला पंतप्रधांनांचे बोलणे कसे समजत होते, हा प्रश्न पडला होता. सोशल मीडियावर याचीच मोठ्याप्रमाणात चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान मोदींनीच 'मन की बात' मध्ये याचे उत्तर दिले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही लोक संकोचून मला एक प्रश्न विचारत होते की, तुम्ही हिंदी बोलत होता आणि बेअर ग्रिल्सला तर हिंदी येत नाही, हे नंतर एडिट केले का? याचे चित्रीकरण वारंवार करावे लागले का ? अशी अनेक प्रश्नं उत्सुकतेपोटी विचारली जात होती. 

ते पुढे म्हणाले, यात काही रहस्य नाही. वास्तवात बेअर ग्रिल्सशी चर्चेदरम्यान तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्यात आला. जेव्हा मी काही बोलत असत. त्याचवेळी त्याचे इंग्रजीत भाषांतर होत असत. बेअर ग्रिल्सच्या कानात एक छोटासा कॉर्डलेस यंत्र लावण्यात आले होते. मी हिंदीत बोलत असत आणि ग्रिल्सला ते इंग्रजीत ऐकू येत. 

Mann Ki Baat: प्लास्टिकमुक्त भारत अभियानाची मोदींकडून घोषणा

यामुळे आमच्या दोघांमधील संवाद सुलभरित्या झाला. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. या कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने लोक जिम कार्बेटबाबत चर्चा करताना दिसले. मी लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी ईशान्य भारतात जावे. तेथील निसर्ग तुम्ही पाहतच राहाल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mann Ki Baat PM Modi says A lot of people wanted to know how Bear Grylls understood my Hindi