पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसने प्रामाणिक वॉचमनला पंतप्रधान केले, मोदींची मनमोहन सिंगांवर टीका

नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्ष आता वैयक्तिक टीकेवर उतरले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशमधील सागर येथील प्रचारसभेत मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वॉचमन म्हटले आहे. मनमोहन सिंग यांना देशाची चिंता नव्हती. त्यांना केवळ खुर्चीची चिंता होती. त्यामुळेच देश बरबाद होत गेला अशी जहरी टीका त्यांनी केली.

मोदीजी, तुमची कर्म तुमची वाट पाहताहेत; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

मोदी पुढे म्हणाले, क्रिकेटमध्ये दिवसाचा खेळ संपत असताना शेवटचे एक-दोन षटक शिल्लक असताना जर एखादा गडी बाद झाला तर खालच्या फळीतील एकाला फलंदाजीस पाठवले जाते. त्याला नाईट वॉचमनचे काम करावे लागते. नाईट वॉचमन पाठवतात..जे चांगले खेळाडू आहेत. त्यांना पाठवत नाहीत. 

ते पुढे म्हणाले, २००४ मध्ये त्यांनी विचार ही केला नव्हता. अचानक संधी मिळाली तेव्हा राजकुमार (राहुल गांधी) सांभाळण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्याच कुटुंबाला राजकुमारवर भरवसा नव्हता. मग राजकुमार तयार होईपर्यंत त्यांनी एका वॉचमनला बसवण्याची योजना बनवली. त्यांना वाटले की, राजकुमार आज शिकतील, उद्या शिकतील..सर्वजण वाट पाहत बसले. भरपूर प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण सर्व व्यर्थ गेले. 

समाजवादी पक्षाकडून मायावतींची फसवणूक, मोदींचा आरोप

या प्रयत्नात देशाचे १० वर्षे बरबाद झाले. पंतप्रधानांकड रिमोट नव्हता, तो दुसऱ्याकडेच होता. ते देशाची चिंता सोडून खुर्चीची चिंता करु लागे. देशाला या दहा वर्षांत प्रत्येक क्षेत्रात निराशा दिसून आली. अखेर २०१४ मध्ये देशातील जनता यातून बाहेर पडली, असे ते म्हणाले.