पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झुंडबळीमुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग चिंतेत; व्यक्त केले हे मत

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग यांनी झुंडबळी सारख्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'गेल्या काही वर्षापासून देश त्रासदायक विचारसरणीचा साक्षीदार बनत आहे. वाढती असहिष्णुता, सांप्रदायिक ध्रुवीकरण, हिंसक गुन्ह्यांच्या वाढत्या घटना आणि झुंडबळी यामुळे आपल्या समाजाला हानी पोहचत आहे.' माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ७५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजीव गांधींना श्रध्दांजली वाहिल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.

२२ ऑगस्टला मनसेचं 'चलो ईडी कार्यालय', पण शांततेत

दरम्यान, 'बाहेरील आणि अंतर्गत काही असंतुष्ट शक्ती स्वार्थापोटी भारताचे विभाजन करण्यासाठी हिंसा आणि धार्मिक कट्टरता भडकवण्याचे काम करत आहे', असे त्यांनी सांगितले. तसंच, 'अशा घटनांना आळा घालण्यासाठी आपण कसे योगदान देऊ शकतो याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. भारत अविभाज्य आहे. धर्मनिरपेक्षता राष्ट्रवादाचा आधार आहे. कोणताच धर्म द्वेष आणि असहिष्णुतेची शिकवण देत नाही,' असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे. 

'चांद्रयान २'चा यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश

दरम्यान, माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. मंगळवारी मनमोहन सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी भाजपच्या एकाही उमेदवाराने त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राजस्थानमधील भाजपचे राज्यसभा सदस्य मदन लाल सैनी यांचे जूनमध्ये निधन झाले होते. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

कर्नाटकः एक माजी CM, २ माजी उपमुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश