पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिरासाठी सोन्याची वीट देईन, पण एका अटीवर - मुघल वंशज हबीबुद्दिन तुसी

हबीबुद्दिन तुसी

मुघल साम्राज्यातील सम्राट बहादूर शहा जफर याचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्या प्रिन्स हबीबुद्दिन तुसी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी सोन्याची वीट देण्याची तयारी दर्शविली आहे. पण यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेचे आपणच मालक आहोत. त्यामुळे ही जागा आपल्या ताब्यात देण्यात यावी, अशी अट त्यांनी घातली आहे.

वडिलांच्या मर्जीविरोधात लग्न करणारी साक्षी मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत

आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ हबीबुद्दिन तुसी यांनी म्हटले आहे की, १५२९ मध्ये मुघल सम्राट बाबर यानेच बाबरी मशिद बांधली होती. मी त्यांचाच वंशज आहे. त्यामुळे अयोध्येतील या जागेवर माझा हक्क आहे. ती माझ्याकडे देण्यात यावी. जर सर्वोच्च न्यायालयाने ही जागा माझ्याकडे देण्याचा निर्णय दिला. तर ती संपूर्ण जागा मी राम मंदिराच्या उभारणीसाठी दान करून टाकेन. या संदर्भात लोकांच्या ज्या भावना आहेत. त्यांचा मी आदर करतो. त्याचबरोबर बाबरी मशिदीच्या जागेवर पूर्वी राम मंदिरच होते, असे माझेही म्हणणे आहे.

... तर भाजपमधला 'भा' पण उरला नसता, धनंजय मुंडे यांचा घणाघात

६ डिसेंबर १९९२ रोजी देशभरातून आलेल्या कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती. अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद वादग्रस्त जागेसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यांच्या पीठापुढे रोजच्या रोज सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आपल्यालाही पक्षकार करून घेतले जावे, अशी मागणी हबीबुद्दिन तुसी यांनी केली आहे. त्यांच्या याचिकेवर अद्याप न्यायालयात सुनावणी झालेली नाही.