पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक, बलात्कारानंतर मदतीसाठी आलेल्यांनीच पुन्हा तरुणीवर केला बलात्कार

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

नोकरीच्या निमित्ताने एका ओळखीच्या तरुणाला भेटण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर नोएडामध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. नोएडातील सेक्टर ६३ मध्ये बुधवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास एका बागेमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे या बागेपासून ५०० मीटर अंतरावर पोलिस ठाणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली असून, दोघांचा शोध घेण्यात येतो आहे.

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना विषबाधा

अटक केलेल्यांची नावे रवि, ब्रिजकिशोर, प्रीतम आणि उमेश अशी आहेत. गड्डू आणि शामू हे दोघेही फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची रविशी ओळख होती. रविने तिला भेटण्यासाठी बोलावले होते. भेटल्यानंतर रविच तिला जवळच्या बागेत घेऊन गेला. तिथे तिच्यावर त्याने बलात्कार करण्यास सुरुवात केल्यावर ती ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिथे आलेल्या गुड्डू आणि शामू हे दोघेही तिथे आले. त्यांनी रविला मारहाण केल्यावर तो तिथून पळून गेला. यानंतर या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला आणि आपल्या इतर मित्रांना तिथे बोलावून घेतले. ब्रिजकिशोर, उमेश आणि प्रीतम हे तिघेही तिथे आल्यावर त्यांनीही या तरुणीवर बलात्कार केला आणि हे सगळेच घटनास्थळावरून पळून गेले.

या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. आरोपी रवि हा एका निर्यात कंपनीमध्ये शिपाई म्हणून काम करतो. ब्रिजकिशोर, उमेश आणि प्रीतम हे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. 

काळवीट, हरिणाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले

पीडित तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या जीविताला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.