पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ह्रतिक रोशन आवडतो म्हणून त्याने बायकोला ठार मारले आणि आत्महत्या केली

ह्रतिक रोशन

पत्नीला अभिनेता ह्रतिक रोशन आवडतो म्हणून चिडलेल्या पतीने तिला मारून टाकले आणि नंतर आत्महत्या करून स्वतःलाही संपवले. अमेरिकेमध्ये ही घटना घडली. तेथील माध्यमांनी या संदर्भाती वृत्त प्रसारित केले आहे. दिनेश्वर बुद्धिदात असे पतीचे तर डोन डोजॉय असे पत्नीचे नाव आहे.

काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीच्या बैठकीबद्दल मला माहीत नाहीः शरद पवार

दिनेश्वर हे एका मद्यपानाच्या दुकानात बारटेंडर म्हणून काम करीत होते. त्यांची पत्नी डोन यांना ह्रतिक रोशन खूप आवडायचा. त्या ह्रतिकच्या मोठ्या फॅन होत्या. त्यामुळे चिडलेल्या दिनेश्वर यांनी आपल्या पत्नीला जोरदार मारहाण केली. त्यामध्ये त्या मृत पावल्या. यानंतर एका झाडाला गळफास घेऊन दिनेश्वर यांनी स्वतःचा जीवही संपवला.

शरद पवार यांनी लीलावतीमध्ये घेतली संजय राऊतांची भेट

पत्नी डोनने ह्रतिक रोशनचा चित्रपट किंवा त्याची गाणी ऐकलेलीही दिनेश्वरला आवडत नव्हते. तो लगेचच पत्नीला गाणे किंवा चित्रपट बंद करायला सांगायचा, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी स्थानिक माध्यमांना दिले. ह्रतिकचा कोणताही नवा चित्रपट बघणे डोनला आवडायचे पण त्याला तिच्या पतीचा तीव्र विरोध होता. त्यातूनच पुढे ही घटना घडली.