पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पित्याने संपत्तीतून बेदखल केलं, रागाच्या भरात मुलाने स्वतःवर झाडली गोळी

प्रतिकात्मक छायाचित्र

पित्याने संपत्तीतून बेदखल केल्याने युवकाने स्वतःवर गोळी झाडल्याची घटना ग्रेटर नोएडातील दादरी कोतवाली परिसरात मेवातियान गल्लीत घडली. गोळी छातीत घुसल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. 

हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, अयोध्येत मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मेवातियान गल्लीत राहणाऱ्या यासीन यांना पाच मुले आहेत. सर्वांत छोटा सद्दाम या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. तो पाच दिवसांपासून घरी आला नव्हता. तो रोज नशेत घरी यायचा आणि कुटुंबीयांशी भांडत असत. त्यामुळे यासीन यांनी त्याला संपत्तीतून बेदखल केले होते, असे त्याचा भाऊ बादशहाने सांगितले. 

फुल न फुलाची पाकळी! शिवसेनेकडून राम मंदिरासाठी १ कोटी

आपल्याला संपत्तीतून बेदखल केल्याचे समजताच सद्दाम घरातून गायब झाला होता. गुरुवारी रात्री उशिरा तो घराच्या दरवाजासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसला. सद्दामला संपत्तीतून बेदखल केले होते. त्यामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे एसएचओ दिनेश सिंह यांनी सांगितले.