पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी बँकेतून पैसे लुटले मग 'मेरी ख्रिस्मस' म्हणत लोकांवर उधळले

पासष्टी ओलांडलेले डायन पास्कल हे सध्या चर्चेत आहे

पांढरी दाढी वाढवलेले, वयाची पासष्टी ओलांडलेले डायन पास्कल हे सध्या चर्चेत आहेत. ख्रिस्मसच्या आधी एका बँकेतून त्यांनी चोरी केली. आश्चर्य म्हणजे चोरलेले पैसे बँकेतून बाहेर  आल्यानंतर 'मेरी ख्रिस्मस' म्हणत त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यावर उधळले देखील. 

मीम्सचा आनंद घ्या, मोदींचं 'कूल' उत्तर

अमेरिकेतील ही घटना असून कोलोरॅडो  पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत अॅकॅडमी बँकेतून रोकड लुटली. त्यांनी किती रोकड लुटली हे समजलं नाही. 

रेल्वे मंत्री म्हणतात, १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय

मात्र बँकेतून बाहेर येताच हे पैसे स्वत:जवळ न ठेवता त्यांनी रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर उधळले. पोलिसांनी त्याला जवळच्या कॉफी शॉपमधून अटक केली आहे. काही लोकांनी हे पैसे बँकेला परतही केली, मात्र अजूनही हजारो डॉलर्सचा हिशेब पोलिसांना लागत नाहिये. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:man robbed a bank and then threw stolen cash in the air and wished passers by a merry Christmas