पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आईस्क्रीम खाण्यास नकार दिल्याने युवकाची हत्या

आईस्क्रीम खाण्यास नकार दिल्याने युवकाची हत्या

राजधानी दिल्लीत मोफत आईस्क्रीम खाण्यास नकार दिल्यामुळे चार जणांनी एका २५ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. 

दिशा कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावणार: गृहमंत्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शर्माच्या (वय २५) हत्येच्या चार तासांत लक्ष्य (२७) त्याचा मोठा भाऊ करण (२९) आणि मित्र धीरज (२६) व अविनाश (२७) यांना अटक करण्यात आली. मेरठ येथील लाला लजपतराय मेमोरियल मेडिकल कॉलेजमधून लक्ष्यने नुकताच एमबीबीएसची परीक्षा दिली होती. याच आनंदात तो गुरुवारी रोहिणी येथील आपल्या घरी करण, धीरज आणि अविनाशबरोबर पार्टी दिली होती.

पाकची भारताला साथ, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी

त्यानंतर हे सर्वजण आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी त्यांना अमित शर्मा त्याचा नातेवाईक राहुल आणि मित्र ईशांतबरोबर दिसला. दारुच्या नशेत असलेल्या लक्ष्य आणि त्याच्या मित्रांनी अमितला आईस्क्रीम खाण्यास सांगितले. अमितने नकार दिल्यानंतर दोन्ही गटात वाद सुरु झाला. 

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

लक्ष्य आणि त्याच्या मित्रांनी रोहिणीच्या सेक्टर ३ मध्ये अमित शर्माला पकडले आणि त्याच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. हल्ल्यात अमित शर्माच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

कोरोना विषाणूमुळे बेंगळुरुतील इन्फोसिसची इमारत केली रिकामी

प्रत्यक्षदर्शी तसेच राहुल आणि ईशांतने हल्लेखोरांच्या दुचाकीचा नंबर नोंदवून ठेवली होती. याच्या आधारावर पोलिसांनी अवघ्या चार तासांत चारही व्यक्तींना अटक केली.