पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चार वर्षांच्या मुलीसह पित्याने बाल्कनीतून मारली उडी, दोघांचाही मृत्यू

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

चेन्नईतील माधवराम परिसरात एका व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावरील आपल्या घरातील बाल्कनीतून चार वर्षांच्या मुलीसह उडी मारली. यात दोघांचाही मृत्यू झाला. उडी मारलेला ३५ वर्षीय पिता हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव तिरुपती रेड्डी आणि मुलीचे नाव टी हरिका असे आहे. ही घटना दुपारी २ च्या सुमारास माधवनम येथील पोन्नियम्मन मेडू परिसरातील चार मजली अपार्टमेंटमध्ये घडली. 

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, तिरुपती रेड्डी आपल्या मुलीला पकडून अपार्टमेंटच्या बाल्कनीच्या पॅराफिटवर चढताना काहींनी पाहिले. लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्याने मुलीसह वरुन उडी मारली. खाली वडील आणि चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांना त्वरीत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

तिरुपतीकडे सूसाईड नोट सापडलेली नाही. प्राथमिक चौकशीनुसार मृत तिरुपती हा एका लसूण गोदामात रोखपाल म्हणून कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे त्याची नोकरीही गेली होती. तिरुपतीच्या मागे पत्नी सुनीता आणि एक पाच वर्षांचा मुलगा आहे.