पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवऱ्याने धावत्या मेट्रोपुढे उडी मारल्यावर पत्नीने मुलीसह स्वतःला संपवले

मुंबई मेट्रो

नवऱ्याने शुक्रवारी रात्री दिल्लीमध्ये धावत्या मेट्रोपुढे उडी मारून आत्महत्या केल्यानंतर काही तासांतच त्याच्या पत्नीने मुलीला गळफास देऊन नंतर स्वतःही आत्महत्या केली. नोएडामध्ये ही घटना घडली. आर्थिक अडचणीमुळे संपूर्ण कुटुंबाने हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कुटूंब मुळचे तामिळनाडूतील होते.

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मेट्रोपुढे उडी मारून आत्महत्या करणारी व्यक्ती एका खासगी कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करीत होती. तिचे वय ३३ होते, असे पोलिस अधिकारी श्वेताभ पांडे यांनी सांगितले. ते आपली ३० वर्षांची पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत राहात होते. त्यांची पत्नी गृहिणी होती तर मुलगी शाळेत बालवाडीत होती. 

शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मेट्रो स्थानकावर त्यांनी धावत्या मेट्रोपुढे उडी मारून आत्महत्या केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण ते मृत पावले.

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी

पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यावर मृत व्यक्तीची पत्नी आपल्या मुलीसह तिथे आली. मृत व्यक्तीचा भाऊही तिथे आला होता. तो रुग्णालयातच थांबला पण पत्नी आणि मुलगी घरी निघून गेले. त्यानंतर पत्नीने आधी मुलीला गळफास लावल्याचे आणि नंतर स्वतः आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.