पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून त्याने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या मॉडेलचा खून केला!

मॉडेल एकातेरिना काराग्लानोव्हा

सुटी घेऊन दुसऱ्या पुरुषासोबत फिरायला जात असल्याने रागाच्या भरात एकाने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या रशियातील मॉडेलचा खून केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी रशियातील पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

... त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, शरद पवार यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला

मॉस्कोमध्ये इन्स्टाग्रामवरील एका प्रसिद्ध मॉडेलचा मृतदेह एका सुटकेसमधून भरल्याचे तिच्या पालकांना आढळल्याने खळबळ उडाली होती. ती मॉस्कोमध्ये जिथे राहात होती. तिथेच एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. एकातेरिना काराग्लानोव्हा असे या मॉडेलचे नाव आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ८५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गळा कापून तिची हत्या करण्यात आली.

भावोजी अस्त्र: आदेश बांदेकर साधणार माऊलींशी संवाद

रशियातील माध्यमांच्या वृत्तानुसार, हत्येपूर्वी एकातेरिना हिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याच्या कोणत्याही खुणा तिच्या शरीरावर आढळत नाहीत. त्याचबरोबर तिच्या घरामध्येही कोणतेही धारदार शस्त्र सापडलेले नव्हते.