पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आयफोन ७ प्लस'च्या जागी साबणाची वडी, १ लाखांची नुकसान भरपाई

आयफोन

ई- कॉमर्स साइटवरून 'आयफोन ७ प्लस मागवल्यानंतर फसवणुक झालेल्या ग्राहकाला १ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोहाली ग्राहक मंचानं दिले आहेत. 

प्रवीण कुमार शर्मा या ग्राहकानं ४ मार्च २०१७ मध्ये स्नॅपडील या इ-कॉमर्स साइटवरून आयफोन ७ प्लस मागवला होता. मात्र बॉक्समध्ये आयफोनऐवजी साबणाच्या वड्या निघाल्या. त्यानंतर ब्लूडार्ट या कुरिअर सेवा देणाऱ्या कंपनीकडे प्रवीण यांनी तक्रार केली. मात्र स्नॅपडीलकडून उत्पादन पाकिटबंद करण्यात आल्यानं यासाठी आम्ही जबाबदार नसल्याचं ब्लूडार्टनं म्हटलं.

जनगणना २०२१ हायटेक, स्वतः ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा

संबधीत प्रकाराची तक्रार करण्यासाठी प्रवीण यानं स्नॅपडीललाही मेल लिहिला. मात्र तक्रारीचं निवारण करण्याऐवजी स्नॅपडीलनं आपलं अकाऊंट डीलीट केलं असा आरोप प्रवीण कुमार शर्मानं केला आहे.

झोमॅटोच्या ऑर्डरमुळे ट्विटरवर चर्चेत आलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांची नोटीस

फसवणुक झाल्याची तक्रार प्रवीण कुमार शर्मा  यानं मोहाली ग्राहक मंचाकडे केली. या प्रकरणात दोन वर्षांनी प्रवीण कुमार यांना न्याय  मिळाला असून मंचानं स्नॅपडिल, पोयोस फॅशन आणि ब्लू डार्टला १ लाख रुपयांची  नुकसान भरपाई कुमार शर्मा यांना देण्याचे आदेश दिले आहेत.