पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : ... आणि चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले

वाहनचालक वाहतूक पोलिसाला आपल्या गाडीच्या बोनेटवरून पुढे नेताना

वाहन चालकांच्या गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असलेल्या चौकात एका वाहनचालकाने एका पोलिस कर्मचाऱ्याला गाडीच्या बोनेटवरून दोन किलोमीटर लांब नेल्याची घटना दिल्लीत घडली. संबंधित गाडीचालकाला रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी गाडीच्या बोनेटवर चढला होता. पण वाहनचालकाने त्यानंतरही गाडी थांबविली नाही. या घटनेत संबंधित पोलिस जखमी झाला आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली. पण त्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला.

केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण

दिल्लीच्या बाहेरील नागलोई भागात ही घटना घडली. जखमी पोलिसाचे नाव सुनील आहे. दिल्ली वाहतूक पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस त्या दिवशी नागलोई चौकात येण्या-जाणाऱ्या गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी करीत होते. त्यावेळी समोरून एक गाडी आली. पोलिसांनी त्याला गाडी थांबविण्याचा इशारा केला. चालकाने गाडीचा वेग आधी कमी केला पण नंतर पुन्हा वेग वाढवून तो निघून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी गाडी थांबविण्यासाठी सुनील यांनी त्या गाडीच्या बोनेटवर उडी मारली.

... म्हणून दिल्ली, मुंबईत ड्रोनने पिझ्झा डिलिव्हरी शक्य नाही

सुनील बोनेटवर चढल्यानंतरही चालकाने गाडी थांबविली नाही. तो तसाच गाडी पुढे दामटत राहिला. सुमारे दोन किलोमीटर त्याने तशीच गाडी पुढे नेली. गाडीतील एका प्रवाशाने त्याच्याकडील मोबाईलवर हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला. पोलिसाच्या अनेक विनंत्यांनंतर चालकाने खूप वेळाने गाडी थांबविली. त्यानंतर सुनील गाडीवरून खाली पडल्यावर तो लगेचच पळून गेला.