पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची भीती! १६०० किमी चालत आलेल्या मुलाला आईने घेतलं नाही घरात

लॉकडाऊनमुळे गावाकडे चालत निघाले तरुण

देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भितीपोटी एका आईने आपल्या मुलालाच घरात न घेतल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मुंबईमध्ये काम करणारा तरुण वारणसीला आपल्या गावी चालत गेला. घरापर्यंत तो पोहचला खरा मात्र त्याला घरात कोणीच घेतले नाही. या तरुणाला सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

लॉकडाऊन मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकारचा असा असू शकतो प्लॅन

वाराणसी येथील मंडी सप्तसागरजवळ राहणारा तरुण मुंबई सेंट्रल येथील नागपाडा भागातील एका हॉटेलवर काम करत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने हा तरुण आपल्या ६ मित्रांसोबत गावाकडे निघाला. तब्बल १६०० किलोमीटर चालत तो रविवारी आपल्या गावी पोहचला. 

'लॉकडाऊनचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर होणार कारवाई'

मुंबईवरुन तो आल्याचे कळताच त्याच्या गावात एकच खळबळ उडाली. कोरोना तपासणी करुन त्याला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर हा तरुण घरी गेला. तर त्याची आई आणि भावाने घराचा दरवाजा खोलला नाही. दरम्यान, ऐवढ्या लांबचा चालत प्रवास केल्यामुळे या तरुणाला अशक्तपणा आला आहे. सध्या त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १९८२ वर, २१७ रुग्णांना डिस्चार्ज

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:man come home walking mumbai to varanasi 1600 km mother did not open the door no entry due to fear covid 19