पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि स्वस्तात कांदे विकणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याचे बोटच त्याने चावले!

घटना घडली त्यावेळचे छायाचित्र

स्वस्तात कांदे विकत असल्यामुळे एका व्यक्तीने काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचे हाताचे बोट चावल्याची घटना उत्तराखंडमध्ये नैनिताल येथे घडली. बोट चावणारी व्यक्ती भाजप समर्थक असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. पण भाजपने त्या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मनिष बिश्त असे बोट चावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

अर्थव्यवस्थेला उभारीसाठी करदरात कपातीचाही विचार - निर्मला सीतारामन

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदन मेहरा म्हणाले की आम्ही स्वस्तात कांदे विकत होतो. त्यावेळी मनिष बिश्त तिथे गोंधळ घालू लागले. त्यांनी तिथे शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माझ्या हाताच्या बोटाचे टोक चावले. यामुळे माझ्या बोटातून रक्त वाहू लागले. हे पाहिल्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी लगेचच पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मनिष बिश्त यांना ताब्यात घेतले, असे नंदन मेहरा यांनी सांगितले.

मनिष बिश्त आम्हाला शिवीगाळ करीत होते. मी केवळ त्यांना शांत राहण्यास सांगत होतो. पण ते आमचे ऐकत नव्हते. ते नक्कीच भाजपचे सदस्य असणार म्हणूनच ते आमचा उपक्रम हाणून पाडण्याच्या प्रयत्नात होते, असे नंदन मेहरा यांनी म्हटले आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीने स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे

या प्रकरणी पोलिस अधिकारी विक्रम राठोड म्हणाले की, प्राथमिक तपासामध्ये मनिष बिश्त यांनी मद्यपान केले असल्याचे किंवा त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याची शक्यता आहे. आम्ही तपास करीत आहोत.