पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया परिसरात तरुणाचा गोळीबार, एक जण जखमी

हातात पिस्तूल घेऊन निघालेला तरूण

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया परिसरात निघणाऱ्या मोर्चापूर्वी एका  तरूणाने आपल्या हातातील पिस्तूलाने एका विद्यार्थ्यावर गोळीबार केला. ये लो आझादी असेही हा तरूण जोरजोरात ओरडला. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. हा तरूण हातातील पिस्तूल इतरांच्या दिशेने रोखत निघाला होता. गोळीबार करण्यात आलेला तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

कोरोना विषाणू: केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

हातात पिस्तूल घेऊन निघालेल्या या तरुणाला वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामननी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. तो काहीवेळ कॅमेऱ्यांच्या दिशेनेही पिस्तूल रोखून होता. या तरुणाचा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे. हातात पिस्तूल घेण्यापूर्वी या तरुणाने एक फेसबुक लाईव्हही केले. रामभक्त गोपाल असे नाव या फेसबुक हँडलचे आहे. 

...तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल; अशोक चव्हाणांचा इशारा

जामिया समन्वय समितीने महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित एनआरसीविरोधात गुरुवारी राजघाटापर्यंत मोर्चा आयोजित केला आहे. याच मोर्चाच्या सुरुवातीला ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच शाहिन बागेमध्ये निदर्शनांच्या ठिकाणी एक तरूण असाच पिस्तूल घेऊन आला होता.