पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खोडसाळ ट्विटर युजरच्या मागणीला आनंद महिंद्रा यांचे भन्नाट उत्तर!

आनंद महिंद्रा

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर खूप सक्रीय असतात. त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्सनी आतापर्यंत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशाच एका खोडसाळ ट्विटर युजरला त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

इन्कम टॅक्स रिटर्नमधील माहितीचे पुरावे सात वर्षे जपून ठेवा, नाहीतर...

विपूल नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विटच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का, असा प्रश्न या युजरने विचारला.

त्याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. तुम्ही विपूलवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण विपूल मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही. माझा धंदाच बंद होईल.