पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : या निर्णयासंदर्भात ममतांनी मोदी-शहांकडे मागितले स्पष्टीकरण

ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी

देशव्यापी लॉकडाउनच्या दरम्यान विविध राज्यात कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकांकडून विशेष पथक पाठवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप नोंदवला आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय पथक पाठवण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकर द्यावे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

 

 

नव्या ४,६६ रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,६६६ वर

केंद्र सरकारने कोणत्या आधारावर राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथके पाठवण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाउनच्या काळात ठिकठिकाणी उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या अंतर्गत पथकाची स्थापना केली आहे. केंद्रीय पथकाकडून पश्चिम बंगालमधील कोलकातासह वेगवेगळ्या राज्यातील सात जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.  

लॉकडाऊननंतर कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला: आरोग्य मंत्रालय

ममता बॅनर्जी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, कोरोना विषाणूविरोधातील लढाईत सकारात्मक समर्थन आणि सूचना दिल्याप्रकरणी आम्ही केंद्र सरकारचे स्वागत करतो. पण केंद्र सरकारने विशेष पथकासंदर्भातील घेतलेला निर्णय हा समजण्यापलिकडचा आहे. कोणत्या आधारावर या पथकाची स्थापना करण्यात आली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्पष्टीकर द्यावे, असेही त्या म्हणाल्या आहेत. कोणत्या निकषावर विशेष पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला हे समजल्याशिवाय आम्हाला हा निर्णय मान्य नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.  केंद्र सरकारने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाची निर्मिती केली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mamta angry over sending Kovid-19 team to Bengal says- PM Modi and Amit Shah should clarify