पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि ममता बॅनर्जी यांनी निर्णय फिरवला

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दिक युद्ध यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विशेष लक्षवेधी ठरले होते. पण निवडणुकीत मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी जाहीर केल्यावर त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. हा घटनात्मक कार्यक्रम आहे आणि मला त्याचे निमंत्रण आहे. त्यामुळे मी उपस्थित राहणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. पण बुधवारी त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. अर्थात याला कारण ठरला नरेंद्र मोदींचा एक निर्णय.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीत राजकीय हिंसाचारात मृत पावलेल्या ५४ भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून माध्यमांमध्ये या संबंधीचे वृत्त प्रसारित होत आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय ममता बॅनर्जी यांना आवडलेला नाही. यामुळेच त्यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. जर या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या तर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झाला हे त्यांनी मान्य केल्यासारखेच आहे. त्याचा त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. यामुळे त्यांनी सावधगिरीने पावले टाकत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. 

शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झालेला नसल्याचे म्हटले आहे. ज्या हत्या झाल्या आहेत. त्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक वादातून झाल्या आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी शपथविधी सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रकार भाजप करीत असून, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mamata Banerjee to skip PM Modis oath event after invites to families of BJP workers killed in Bengal violence