पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी जाणार

ममता बॅनर्जी

येत्या गुरुवारी, ३० मे रोजी होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती माध्यमांना दिली. एएनआयने हे वृत्त दिले आहे. हा औपचारिक कार्यक्रम आहे. मला या कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. त्यामुळे मी उपस्थित राहणार आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. दोन्ही नेत्यांनी जाहीर सभांमध्ये एकमेकांवर कडव्या शब्दांत टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार हे महत्त्वाचे मानले जात आहे. 

अंतर्गत राजकारणामुळे आम्हाला शपथविधीचे निमंत्रण नाही, पाकचे पररराष्ट्र मंत्री

मी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आणि शपथविधी सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. राज्यातील ४२ जागांपैकी भाजपला १८ जागांवर यश मिळाले. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या जागा २२ पर्यंत कमी झाल्या आहेत. आजच तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांनी आणि ३० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.