पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताचे PM आहात की पाकचे अँबेसिडर? ममतांचा मोदींना सवाल

ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) च्या मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सिलीगुडी येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला. तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्ताने  अँबेसिडर असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे. यापूर्वी काँग्रेसने मोदींवर टीका केली होती.  

पाकविरुद्धच्या युद्धांचे दाखले देत काँग्रेसने साधला PM मोदींवर निशाणा

गुरुवारी कर्नाटकमधील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन हे  संसदेच्या विरोधातील आंदोलन असल्याचे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी संसदेविरोधात आंदोलन करण्याऐवजी पाकमध्ये अल्पसंख्यांकावर होणाऱ्या आत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरोधात आंदोलन करायला हवे, असेही मोदी म्हणाले होते.  मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारत हा समृद्ध वारसा असणारा आणि संस्कृती जपणारा देश आहे. आमच्या देशाची तुम्ही नेहमी पाकिस्तानशी तुलना का करता? तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत? (अँबेसिडर) तुम्ही प्रत्येक मुद्यावर पाकिस्तानच्या नावाचा उच्चार का करता? अशा प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी मोदींना लक्ष्य केले.

राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांना अमित शहांनी दिले चॅलेंज 

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात ममता म्हणाल्या  की, स्वातंत्र्य मिशून ७० वर्षांचा काळ उलटल्यानंतर आम्ही या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्याची वेळ येणे ही लाजिरवाणी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताविषयीच्या गोष्टी विसरलेत म्हणून त्यांना वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करावा लागतोय का? असा प्रश्नार्थक टोलाही ममता बॅनर्जी यांनी मोदींना लगावला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mamata Banerjee Sharp Attack on PM Narendra Modi Are you prime minister of India or ambassador of Pakistan