पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'PM मोदींशी चर्चा करायला तयार, आधी CAAला मागे घ्या'

ममता बॅनर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्यास तयार आहे. मात्र त्यांना नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा लागेल, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केले. पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला जात आहे. सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये या कायद्याविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

 

'९ फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाही'

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, ' हे चांगले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्यास मी तयार आहे. पण त्यांना नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा लागेल. तसंच, पंतप्रधानांनी काश्मीर, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली नव्हती. एनआरसी, एनपीआर आणि सीएए देशासाठी वाईट आहेत.' असे त्यांनी सांगितले. 

नाशिक : रिक्षाला धडक देऊन एसटी बस विहिरीत, ७ ठार

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आयोजित केलेल्या आंदोलना दरम्यान ममता बॅनर्जी यांनी असे सांगितले की, 'एनआरसी आणि एनपीआर लागू होऊ देणार नाही. आम्हाला अखंड भारत हवा आहे. आम्हाला अखंड बंगाल हवा आहे.' दरम्यान, या आधी पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करणारे बंगाल चौथे राज्य आहे. ममता बॅनर्जींनी सोमवारी सांगितले होते की, हे आंदोलन फक्त अल्पसंख्याकांचे नाही तर देशातील सर्वांचे आहे. 

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतोः PM मोदी