पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमध्ये राहणारे सर्व बांगलादेशी भारतीय नागरिक: ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

'बांगलादेशातून आलेले आणि ज्यांनी निवडणुकीमध्ये मतदान केले आहे ते सर्व जण भारतीय आहेत. त्यांना नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.', असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले. ममता बॅनर्जींनी दिल्ली हिंसाचारावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालला दुसरी दिल्ली होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जींची सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या.

 

दिल्ली: कोरोनाच्या २४ संशयित रुग्णांना ITBP कॅम्पवर हलवले

एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, 'बांगलादेशवरुन आलेले लोकं भारताचे नागरिक आहेत. त्यांच्याकडे नागरिकत्व आहे. तुम्हाला नागरिकत्वासाठी पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही निवडणुकीत मतदान करुन पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना निवडून देता आणि आता ते म्हणतात तुम्ही नागरिक नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.', असे आवाहन ममता बॅनर्जींनी केले आहे. 

जयपूरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण; भारतात रुग्णांची संख्या ६ वर

यावेळी ममता बॅनर्जी यांनी खडसावून सांगितले की, 'एकाही नागरिकाला बंगालमधून बाहेर काढून देणार नाही. तसंच राज्यात राहणाऱ्या कोणत्याही निर्वासिताला नागरिकत्वापासून वंचित ठेवले जाणार नाही. यावेळी दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी यांनी असे सांगितले की, 'विसरू नका की हे बंगाल आहे. जे काही दिल्लीमध्ये झाले ते इथे होऊन देणार नाही. आम्हाला बंगालला दुसरी दिल्ली होऊन द्यायची नाही.', असे ममता बॅनर्जींनी सांगितले. 

लवकरच १०० युनिटपर्यंत वीज मोफत, सरकारची विधान परिषदेत माहिती