पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममता बॅनर्जी नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा जोरदार रंगला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्या होत्या. 

राजस्थानमध्ये मायावतींना झटका; ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

या सर्व घडामोडींशी संबंधित तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी मंगळवारीच नवी दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. पंतप्रधानांशी होणाऱ्या भेटीमध्ये केवळ प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होईल. ममता बॅनर्जी या कायम राजकीय आणि प्रशासकीय मुद्दे वेगवेगळे ठेवतात. त्यामुळे पंतप्रधानांशी केवळ प्रशासकीय मुद्द्यांवरच चर्चा होईल. खूप दिवसांपूर्वीच पंतप्रधानांकडे यासाठी वेळ मागण्यात आली होती. त्यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांची भेट घेत आहेत, असे या सूत्राने सांगितले.

पश्चिम बंगालमध्येही आसामप्रमाणे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी NRC केली जावी, अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्याला ममता बॅनर्जी यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विरोध आहे. त्यावरही पंतप्रधानांशी चर्चा होण्याची शक्यता असून, ममता बॅनर्जी या संदर्भात आपला विरोध थेटपणे नोंदवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारत-पाकमधील तणाव कमी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भेटणार: ट्रम्प

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची कुकर्मे लपविण्याचा प्रयत्न करून आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांनी आपली संपूर्ण कारकीर्द वाया घालवली. आता राजीव कुमार यांच्याभोवतीचा फास आवळला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचे अधिकारी आणि सरकारमधील अधिकारीही घाबरले आहेत. ममता बॅनर्जी आता आपल्या पुतण्याला आणि स्वतःला वाचविण्यासाठीच भेटीगाठी घेत आहेत, असे डाव्या पक्षांचे राज्यातील आमदार सुजन चक्रवर्ती यांनी सांगितले.