पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपला टक्कर देण्यासाठी बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला प्रशांत किशोर

ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आता विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणूक प्रचारतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी गुरुवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

गडकरींविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची हकालपट्टी

नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या कंपनीने वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केले होते. त्या निवडणुकीत त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशांत किशोर यांनी शिवसेनेलाही मदत केली होती. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटले आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. राज्यातील ४२ जागांपैकी १८ जागांवर भाजपचे उमेदवार यशस्वी ठरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला केवळ दोन जागांवर यश मिळाले होते. 

शरद पवार राष्ट्रीय नव्हे तर बारामतीचे नेतेः प्रकाश आंबेडकर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली होती. त्यावेळी भाजपने स्वबळावर लोकसभेत बहुमत मिळवले होते. प्रशांत किशोर यांनी गेल्यावर्षी जनता दल संयुक्तमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mamata Banerjee enrolls poll strategist Prashant Kishor support to counter BJP in 2021 elections