पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बैठकीपूर्वीच विरोधकांच्या एकीला सुरूंग, ममता बॅनर्जींनंतर मायावती काँग्रेसविरोधात

मायावती आणि ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती यांनीही काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही महिला नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधकांच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकीला या बैठकीआधीच सुरुंग लागला आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारला विरोध करण्यासाठी रणनिती निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली आहे.

..तर उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील, गडाखांचा इशारा

मायावती यांनी सोमवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाने तेथील काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. असे असतानाही तेथील बसपच्या आमदाराला फोडून त्याला काँग्रेसमध्ये घेण्याचे काम दुसऱ्यांदा झाले आहे. हा पूर्णपणे विश्वासघाताचा प्रकार आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने आज बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला बहुजन समाज पक्ष उपस्थित राहणार नाही. बहुजन समाज पक्ष पहिल्यापासूनच सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी याच्याविरोधात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी आमची आधीपासूनच मागणी आहे.

उद्धवजी राऊतांना आवरा, मुजोरी खपवून घेणार नाही, संभाजीराजे भडकले

गेल्याच आठवड्यात ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून तेथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका करण्यात येते आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात तृणमूल काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांचा हात असल्याची टीकाही करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला.