पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मला माहीत नाही', न्यायाधीशांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रज्ञासिंह यांचे एकच उत्तर

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील नवर्निवाचित भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयात हजर झाल्या. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी प्रज्ञासिंह यांना अनेक प्रश्ने विचारली. पण बहुतांश प्रश्नांची त्यांनी उत्तरे ही 'मला माहीत नाही' असेच दिले. दरम्यान, प्रज्ञासिंह यांना गुरुवारी न्यायालयात उपस्थितीत राहायचे होते. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना बुधवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

हा गोडसेंच्या विचारांचा विजय, पराभवानंतर दिग्गीराजांची प्रतिक्रिया 

न्यायाधीशांनी विचारले की, आतापर्यंत चौकशी करण्यात आलेल्या साक्षीदारांनी सांगितले आहे की, २९ सप्टेंबर २००८ रोजी स्फोट झाला होता. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. यावर तुमचे मत काय आहे? यावर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 'मला माहीत नाही', असे उत्तर दिले. न्यायाधीशांनी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला. तुमच्या वकिलांनी आतापर्यंत किती साक्षीदारांची चौकशी झाली आहे, याची माहिती दिली आहे का ? यावरही प्रज्ञासिंह यांनी 'मला माहीत नाही', असे उत्तर दिले.

प्रायश्चित घेण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे मौनव्रत

मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी भाजपच्यावतीने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता. तत्पूर्वी, या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांना २१ मे रोजी हजर राहण्यास सूट दिली होती. 

या प्रकरणी ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह ७ लोक आरोपाचा सामना करत आहेत. मालेगावला २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ६ लोक मारले गेले होते. तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.