पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही केराची टोपली नाही, श्रीमंत देशांना त्यांचा कचरा मलेशियानं पाठवला परत

श्रीमंत देशांना त्यांचा कचरा मलेशियानं पाठवला परत

गतवर्षांच्या शेवटच्या तीन महिन्यांपासून मलेशियानं १३ श्रीमंत देशांना त्यांच्याकडून आलेला टाकाऊ प्लास्टिकचा कचरा परत पाठवला आहे. २०१९ च्या शेवटच्या तिमाहित १५० टाकाऊ  प्लास्टिकनं भरलेले कंटेनर माघारी पाठवले असल्याची माहिती  मलेशियाच्या पर्यावरण मंत्र्यांनी दिली आहे. आमचा देश केराची टोपली बनवू पाहणाऱ्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. 

२०१८ साली चीननं टाकाऊ प्लास्टिकची आयात करण्यात बंदी घातली त्यानंतर टाकाऊ प्लास्टिकचे मोठमोठे कंटेनर दक्षिण आशियातील देशांत वळवले गेले. मलेशियासह अनेक विकसनशील देश हा कचरा स्वत:च्या देशात येऊ नये यासाठी लढा देत आहेत. 

बहुमत आहे म्हणून बळजबरी करू शकत नाही, चंद्रकुमार बोस यांचे खडे बोल

पर्यावरण मंत्री येओ बी येन  यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षांच्या मध्यापर्यंत ११०  टाकाऊ प्लास्टिकचे कंटेनर त्या त्या देशांत परत पाठवण्यात येणार आहेत. छुप्या पद्धतीनं देशात आलेला किंवा अनधिकृत प्लास्टिक रिसायकल फॅक्टरीमध्ये  आढळलेला ३ हजार ७३७ मेट्रीक टन कचरा  परत पाठवण्यात  आला आहे असंही येओ  यांनी सांगितलं. 

परत पाठवलेल्या १५० कंटेनरमध्ये ४३ प्लास्टिकचे कंटेनर हे फ्रान्सचे, ४२ युनायटेड किंग्डमचे, १७ अमेरिकेचे, ११ कॅनडा,  १० स्पेन आणि उर्वरित हाँगकाँग, जपान, सिंगापूर, पोर्तुगाल, बांगलादेश, श्रीलंका आणि चीनचे असल्याची माहिती पर्यावरण मंत्र्यांनी दिली आहे. मलेशिया हा काही जगाचा डम्पिंग ग्राऊंड नाही, हे आम्हाला जगाला  ठणकावून सांगायचं आहे, टाकाऊ प्लास्टिक कचरा इथे आणून टाकायला आम्ही केराची टोपली नाही, यापुढे आम्ही कदापी  हे होऊ देणार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे. 

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची बिनविरोध निवड