पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झाकीर नाईक भारतासाठी धोकादायक; मलेशियाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य

झाकीर नाईक

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकबाबत मलेशियाच्या पंतप्रधानांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'झाकीर नाईकला कोणताच देश आपल्याकडे ठेवू इच्छित नाही', असे वक्तव्य पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी केले आहे. तसंच, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझी भेट झाली होती. मात्र झाकीर नाईकला भारतात प्रत्यार्पण करण्याबाबत काहीच बोलणे झाले नाही', असे देखील त्यांनी सांगितले. झाकीर नाईक हा भारतासाठी धोकादायक बनला असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि...

दरम्यान, झाकीर नाईक याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी सांगितले की, 'झाकीर नाईक आमच्या देशाचा नागरिक नाही. त्याला मागच्या सरकारने इथे राहण्यासाठी स्थायी निवासी दर्जा दिला होता. स्थायी निवासीला देशाच्या व्यवस्थेत तसंच राजकारणावर वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. झाकीर नाईकने त्याचे उल्लंघन केले आहे. यासाठी त्याला आता काहीच बोलण्याची परवानगी नाही', असे महाथिर मोहम्मद यांनी सांगितले.

खूशखबर! पीएफवरील व्याजदरात वाढ

तसंच, 'अनेक देशांना झाकीर नाईक नको आहे. जेव्हा मोदी आणि माझी भेट झाली तेव्हा त्यांनी झाकीर नाईकला भारतात प्रत्यार्पण करा असे सांगितले नाही' असे झाकीर नाईकबाबत चर्चा 
झाल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाथिर महोम्मद यांची भेट रशिया येथे झाली होती. दोन्ही पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले होते की, दोन्ही नेत्यांमध्ये झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणावर चर्चा झाली होती. 

लाचारी स्वीकारणाऱ्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवारांचे वक्तव्य