पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मलालानं पाकिस्तानी अल्पसंख्याकांबरोबर वेळ व्यतीत करावा, भाजप खासदारांचा सल्ला

मलाला युसुफझाई  (Photo @Malala)

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती आणि शिक्षण अधिकारासाठी काम करणारी पाकिस्तानची मलाला युसुफझाई हिच्यावर भाजप खासदार शोभा करांदलजे यांनी निशाणा साधला आहे. मलालाने काश्मीरमध्ये शांततेच्या दिशेने पाऊल उचलण्याचा आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. यावरुनच करांदलजे यांनी मलालावर टीकेची झोड उठवली.

सर्वांत कमी वयात नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मलालाने शनिवारी टि्वट केले होते. मी यूएनजीएतील नेत्यांना आवाहन करते की, काश्मीरमध्ये शांततेसाठी काम करा, काश्मिरींचा आवाज ऐका आणि मुलांना सुरक्षित शाळेत जाण्यास मदत करा, असे टि्वटमध्ये म्हटले. 

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'

त्यावर करांदलजे यांनी टि्वट करत मलालाला पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील मुलींवर होत असलेल्या अत्याचाराची आठवण करुन दिली.

स्वात खोऱ्यात वर्ष २०१२ मध्ये तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर २२ वर्षीय मलाला इंग्लंडमध्ये राहत आहे. तिने टि्वट करत काश्मीरमधील विद्यार्थ्यांप्रती चिंता व्यक्त केली. गेल्या ४० हून अधिक दिवसांपासून ही मुले शाळेत गेलेली नाहीत. भीतीपोटी आपल्या घराबाहेर पडत नसल्याचे तिने टि्वटमध्ये म्हटले होते. 

बारामतीः मुख्यमंत्र्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा लाठीमार

काश्मीरमध्ये राहणाऱ्या मुलींशी मी थेट चर्चा करु इच्छिते. काश्मीरमध्ये संवाद माध्यमांवर निर्बंध असल्याने तेथील गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागले. काश्मिरी लोक जगापासून तोडले गेलेले आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडता येईना. काश्मीरला बोलू द्या, असे तिने आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. तिच्या या टि्वटला उत्तर देत शोभा करांदलजे यांनी समाचार घेतला.