पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा'

प्रियांका गांधी

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जावे, अशी मागणी राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी या सक्रीय राजकारणात आलेल्या आहेत. त्यांच्याकडे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली होती.

यूपी बार कौन्सिलच्या महिला अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

लोकसभा निवडणुकीत यंदा पुन्हा एकदा काँग्रेसला उत्तर प्रदेशात जोरदार फटका बसला. त्यामुळे प्रियांका गांधी यांनी मंगळवारी राज्यातील पराभवाची कारणे शोधण्यासाठी एक बैठक बोलावली होती. याच बैठकीला उपस्थित असलेल्या राज्यातील नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून ही मागणी करण्यात आली. उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकच जागेवर यश मिळाले आहे. रायबरेलीतून युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी विजयी झाल्या आहेत. अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातूनही राहुल गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

२०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी आघाडी करू नये, असेही या कार्यकर्त्यांनी सुचविले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात येत्या काही महिन्यांत होणाऱ्या १२ पोटनिवडणुकाही काँग्रेसने पूर्ण ताकदीने लढवाव्यात, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील ११ आमदार हे लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे हामीरपूरमधील आमदार अशोक चांडेल हे अपात्र ठरल्यामुळे एकूण १२ जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

राज्य सरकारचा पवारांना धक्का, नीरेचे पाणी उजव्या कालव्यात सोडणार

वाराणसीतील माजी खासदार राजेश मिश्रा म्हणाले, होय, प्रियांका गांधी यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. तसे केल्यास राज्यात काँग्रेसची एकहाती सत्ता येईल.