पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा ड्युटीवरील पहिला फोटो व्हायरल

महेंद्रसिंह धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बुधवारपासून भारतीय लष्करासोबत काम करण्यास सुरुवात केली. लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी बॅटवर स्वाक्षरी देताना दिसत आहे. धोनी सध्या दक्षिण काश्मीरमध्ये लष्करासोबत कार्यरत आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओढू नका : प्रियांका गांधी

महेंद्रसिंग धोनी सध्या 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये दोन आठवडे काम करणार आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीने लष्कराचा गणवेश घातला असून तो एका बॅटवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. ट्विटरवर एका अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. श्रीनगरवरुन लेफ्टनंट कर्नल धोनीची एक्सक्ल्युझिव फोटो असे या या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. 

सुप्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे यांचं निधन

३८ वर्षाच्या महेंद्र सिंह धोनीने वेस्टइंडीज दौऱ्याला न जाता दोन महिन्याचा ब्रेक घेतला. याच दरम्यान धोनी भारतीय लष्करातील १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये सहभागी झाला. धोनीने पॅरा रेजिमेंटसोबत प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. तो बटालियनसोबत काश्मीर खोऱ्यात ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग आणि गार्डची ड्युटी करणार आहे. २०११ चा विश्वचषक सामना जिंकल्यानंतर महेंद्र सिंह धोनीला 'मानद लेफ्टनंट कर्नल' चा किताब देण्यात आला होता. 

कुलभूषण जाधव यांना काउन्सुलर ऍक्सेससाठी पाककडून प्रस्ताव