पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महात्मा गांधींची १५०वी जयंती: पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रध्दांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे.  यानिमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे. पी नड्डा, पियूष गोयल, लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजघाटावर येऊन महात्मा गांधी यांना श्रध्दांजली वाहिली.

काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख, अरविंद शिंदेंना उमेदवारी

दरम्यान, आज लालबहादूर शास्त्रींची ११५ वी जयंती आहे. विजयघाटावर जाऊन मोदींनी लालबहादूर शास्त्रींना श्रध्दांजली वाहिली. गांधी जयंती निमित्त आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. तसंच ते आज संध्याकाळी महात्मा गांधी यांना श्रध्दांजली वाहन्यासाठी गुजरातच्या साबरमती आश्रमात जाणार आहेत. 

दबावतंत्राच्या राजकारणाला संपवायचं आहेः शरद पवार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज भाजपच्या राष्ट्रव्यापी गांधी संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दिल्लीतील शालिमार बाग येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. चार महिने चालणाऱ्या या यात्रेची सुरुवात देशाच्या विविध भागांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे खासदार, आमदार सहभागी होणार आहेत. ही यात्रा काढण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधी यांचे स्वच्छता, साधेपणा, खादीचा वापर, अहिंसा यासारख्या विचारांना पुढे घेऊन जाणे हा आहे. 

आर्थिक आघाडीवर धक्का, सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुलीत ६ हजार

दरम्यान, गांधी जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस देशभरामध्ये पदयात्रा काढणार आहे. तर, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयापासून ते राजघाटापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये राहुल गांधी सहभागी होणार आहेत. या यात्रेच्या समाप्तीनंतर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना गांधीवाद आणि गांधींचे विचार असलेल्या भारतासाठी काम करण्याचे वचन देणार आहेत. 

उमेदवारी जाहीर झाली नसतानाही खडसेंनी अर्ज भरला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mahatma gandhi jayanti 2019 pm narendra modi and sonia gandhi pays tribute to mahatma gandhi at raj ghat