पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महात्मा गांधी स्वत:ला कट्टर सनातनी हिंदू मानायचे : मोहन भागवत

मोहन भागवत

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हिंदू असल्याची कधीही शरम वाटली नाही. त्यांनी अनेकवेळा स्वत: कट्टर सनातनी  हिंदू असल्याचे सांगितले आहे, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागव यांनी म्हटले आहे. भागवत यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

CAA च्या समर्थनार्थ माजी न्यायाधीशांसह अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

ते पुढे म्हणाले, गांधीजी स्वत:ला कट्टर सनातनी हिंदू मानायचे. पूजा पद्धतीमधील भेदभाव ते मानत नव्हते. तुमच्या श्रद्धेवर ठाम राहा आणि दुसऱ्याच्या श्रद्धेचा सन्मान करा, असा संदेश त्यांनी देऊन ठेवला आहे.  देश घडवण्यासाठी पहिल्यांदा देश समजून घेण्याची गरज होती. हे महात्मा गांधींनाच पहिल्यांदा कळले. त्यासाठीच ते देशभर फिरले. त्यांनी सामान्यांच्या आशा-अपेक्षा आणि त्यांचे दु:ख जवळून पाहिले. त्यानंतर त्यांनी नव्या भारताचे स्वप्न पाहिले.

ब्रिटनच्या महिला खासदाराचा भारत सरकारवर आरोप

गांधींच्या स्वप्नातील भारत आजही बनलेला नाही ही सत्य परिस्थिती आहे. गांधींच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल तर आपल्याला गांधींना समजून घ्यायला हवे. २० वर्षांपूर्वी गांधींच्या स्वप्नातील भारत दिसेल का? याबाबत शंका वाटत होती. परंतु देशभरात फिरताना आज आपण गांधींच्या स्वप्नातील भारताकडे वाटचाल करत असल्याचे वाटते. नवीन पिढीच गांधींनी पाहिलेला भारत साकारेल, असा विश्वासही भागवतांनी यावेळी व्यक्त केला.