देशातील मतदान प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ रहावा, यासाठी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या मागणीसाठी तब्बल १४ वर्षानंतर त्यांनी दिल्ली गाठत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray writes to Election Commission of India regarding "restoring faith in the election process in the country". (file pic) pic.twitter.com/6GBxmmSv8T
— ANI (@ANI) July 8, 2019
राज ठाकरे म्हणाले की, आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे. आम्ही आमचे म्हणणे मांडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव फार काही बरे नव्हते. निवडणूक आयोगाची भेटच घेतली नाही, असा प्रश्न भविष्यात उपस्थित होऊ नये, म्हणून ही औपचारिक भेट होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
ईव्हीएममध्ये घोळ आढळला नाही तर मिशी काढेनः उदयनराजे
ईव्हीएममध्ये जी चिप वापरली जाते ती युएसमध्ये तयार होते, अशी माहिती आयोगाने दिल्याचे सांगताना राज म्हणाले की, युएस हॅकरच्या माध्यमातून मशिन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील जनतेचा लोकशाही प्रक्रियेतील मतदान प्रक्रियेवरील विश्वास कायम राहावा यासाठी मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच व्हायला हवी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात महाराष्ट्रात गेल्यावर पुढचे पाउल उचलू असे संकेतही त्यांनी दिले.