पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Citizenship Act महाराष्ट्र,एमपी आणि छत्तीसगडमध्ये लागू होणार का ?

कमलनाथ, भूपेश बघेल, बाळासाहेब थोरात

नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन आसामसह ईशान्य भारतात तीव्र आंदोलन सुरु आहे. तर काँग्रेस शासित राज्यातही या विधेयकाचा विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्रात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू होईल का, असे विचारले असता त्यांनी आपला पक्ष केंद्रीय नेतृत्वाच्या नीतीचे पालन करेल, असे म्हटले आहे. 

तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही हाच प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नागरिकता दुरुस्ती विधेयकाविषयी काँग्रेसने जो पवित्रा घेतला आहे, त्याचे आम्ही पालन करु. देशाची फाळणी करणाऱ्या प्रक्रियेचे आम्ही हिस्सा का बनू?, असा उलट सवाल त्यांनी केला. 

ब्रिटनमध्ये 'फिर एक बार बोरिस सरकार', ब्रेक्झिटचा मार्ग सुकर

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीपेक्षा आमचे मत वेगळे नाही. आमची भूमिका त्यांच्याप्रमाणेच असेल.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ ला मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या बिगर-मुस्लिम अल्पसंख्यंक प्रवाशांना भारतीय नागरिकता प्रदान करणारे एक अधिनियम बनले आहे.

पुण्यात सावत्र बापाने गळा दाबून केली मुलीची हत्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Minister and Congress leader Balasaheb Thorat and Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath reply on implement Citizenship Amendment Act