पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र ही क्रांतिकारक आणि समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्रामुळे भारताच्या विकास प्रक्रियेला चालना मिळाली आहे. भविष्यातही राज्याची अशीच प्रगती होत राहावी अशी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !,' असे टि्वट मोदींनी केले आहे. 

दरम्यान, राज्यात आज (बुधवार) महाराष्ट्र दिनाचा उत्साह असून देशातील राजकीय नेत्यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रदिनाच्या महाराष्ट्रीय जनतेला हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या वर्षात राज्याने विकासाची नवी उंची गाठावी या सदिच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, ज्ञानोबा-तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra day 2019 pm narendra modi cm devendra fadnavis greatings raj thackeray sharad pawar