पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमधील खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. मोदींसोबतची भेट सकारात्मक झाली असून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट, आदित्यही दिसले सोबत
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना भेटल्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद- LIVE https://t.co/i7QR5dOHTj
— Shivsena Communication (@ShivsenaComms) February 21, 2020
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्यातील वेगवेगळ्या मुद्यावर केंद्राकडून मदतीची आवश्यकता आहे. यासंदर्भातच मोदींशी चर्चा केली. राज्याच्या हिताच्या गोष्टींना केंद्राकडून सहाकार्य मिळेल, असे वचन देखील मोदींनी दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
'पाक जिंदाबाद म्हणणाऱ्या तरुणीचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन'
प्रसारमाध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरेंना सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी याविषयी देखील प्रश्न विचारले. सुधारित नागरिकत्व कायदा हा नागरिकत्व देणारा आहे हिसकावणारा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी या कायद्याचे समर्थन केले आहे. राष्ट्रीय नागरिकत्व कायदा हा आसामशिवाय देशभरातील अन्य राज्यात लागू केला जाणार नाही, अशी केंद्राने भूमिका घेतली आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवर ते म्हणाले की, दर दहावर्षांनी जनगणना ही होतच असते यामध्ये जर काही समस्या उद्धभवली तर वाद होतील. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.