राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राममंदिराच्या निर्मितीसाठी शिवसेनेकडून १ कोटींची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली. यापूर्वी दोनवेळा अयोध्या दौरा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा पहिला अयोध्या दौरा आहे. रामलल्लांचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मंदिर निर्मितीसाठी अर्थिक मदतीची घोषणा केली.
VIDEO : ... आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या निर्मितीसाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून १ कोटींची आर्थिक मदत करणार आहोत. ही मदत राज्य सरकारकडून नव्हे तर शिवसेनेच्या ट्रस्टकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दौऱ्यावर येण्यापूर्वीच ट्रस्टचे खाते काढण्यात आले असून १ कोटी या खात्यात जमा करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. ही मदत राजकीय पक्षाच्यावतीने नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
VIDEO : १०० दिवसांत काय केले १११ सेकंदात पाहा, शिवसेनेचा खास व्हिडिओ
राज्यातील अनेक रामभक्त अयोध्येला रामलल्लांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ ठाकरे यांच्याशी चर्चा करणार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.